पनवेल (संजय कदम) : अवघ्या काही तासावर ‘मकर संक्रात आल्याने त्यानिमित्त लागणाऱ्या वस्तू, साहित्यांनी पनवेल परिसरातील बाजारपेठा सजल्या आहेत. मकर संक्रांती आणि पतंग असे समीकरण असल्याने बाजारात वेगवेगळ्या आकार, रंगांचे पतंग आणि मांजे दिसू लागले आहेत. मागील वर्षीच्या तूलनेत पतंग आणि मांज्याच्या किमतीत १० ते २० टक्यांची बाढ झाली आहे.
पतंग आणि मांजा घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. चायनामेड पतंगसुद्धा पाहायला मिळत आहेत. ग्राहकांची मागणी असल्याने बाजारात पोटी कागदाच्या विविधरंगी, शेपटीच्या चिनशेपटीच्या वेगवेगळ्या आकाराच्या पतंगांबरोबर चायनामेड पीकॉक, रेनबो, टायगर, ड्रगन, इंगल, त्याचबरोबर विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या आकाराच्या बहुरंगी पतंग बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ५० ते ५०० रुपयापर्यंत आहे.
कागदाच्या पारंपरिक पतंगसुद्धा यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेगळ्या आकाराने बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यांच्या किमती मागील वर्षी ५ रुपयांपासून १५० रुपयापर्यंत होत्या सध्या बाजारात असलेल्या विविध आकाराच्या आणि रंगाच्या पतंगावर विविध सेलिब्रेटी आणि राजकारणी यांचे फोटो आहेत. तर, खेळाडू आणि विशेषत बच्चे कंपनीना आकर्षित करण्यासाठी पोकेमॉन छोटा भीम, मोटू तसेच स्पायडरमॅन, सुपर मेन यांची चित्र असलेल्या तसेच इतर विविध कार्टून कलाकारही पतंगावर दिसत आहेत.