पनवेल (संजय कदम) : पनवेल परिसरातून अंमलीपदार्थात बाळगुन विक्री करताना एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३ ग्रॅम चिटा (ब्राउन शुगर) पावडरसह एकूण २६ हजार रुपये किमतीचे ऐवज जप्त केले आहे.
पनवेल शहर पोलिसांचे पथक पनवेल जवळील पळस्पे परिसरात गस्त घालत असताना महेश साहेब देशमुख (वय ३४ वर्षे) हा विटा (शुगर) हा अंमलीपदार्थात बाळगुन विक्री करताना आढळून आला.
त्याच्या कडून पोलिसांनी ३ ग्रॅम चिटा ( ब्राउन शुगर) पावडरसह एक हजार रुपये किंमतीचा छोटा इलेक्ट्रोनिक काटा, प्रत्येकी एक हजार रुपये किंमीतीचे दोन मोबाईल, तसेच २१४००/- रुपये रोख असे एकूण एकूण २६ हजार रुपये किमतीचे ऐवज जप्त केले आहे.
याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपी विरोधात एनडीपीएस कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.