पेण : पनवेल महानगरपालिकेत एकही दिवस रजा न घेता सतत 180 व्या दिवशी पर्यंत कामावर हजर असणारे शिक्षक श्री.वैभव सिताराम पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महानगर पालिकेतील विभागामध्ये काम करत करत असतांना ते जनजागृतीचे काम, दुकाने,माॅल बंद करणे, दुकानांपुढे सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी चौकोन आखणे, लाॅकडावून काळात गरजूनां 50 दिवस दररोज दोनवेळा खारघर- पनवेल मध्ये जवळजवळ 1200 लोकानां जेवण पोहचविणे व वाटप करणे, गरजूनां खारघर -पनवेल मध्ये जवळजवळ 500 कुटुंबानां धान्य पोहचविणे व वाटप करणे, कोविड 19 मुळे दुदैवी मृत्यू झालेल्या एका कुटुंबाला रू.5000 ची आर्थिक मदत पोहोचविणे, उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे कोविड पाॅजिटीव मुळे उपचार घेणा-या 100 रूग्णानां स्वखर्चाने फळे वाटप करणे.
कामोठे-पनवेल संपूर्णपणे कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित केल्यावर चेक पोस्टवर नाईट ड्युटी, पनवेल महानगर पालिका हद्दीत कंटेंटमेंट झोन मधिल सिल केलेल्या इमारतीतील रहिवाश्यानां अन्नधान्य,भाजिपाला व औषधे मागणी नुसार पुरविण्याचे काम केले आहे. COVID 19 मध्ये पनवेल महानगर पालिका ICMR यादीतील कोरोना पाॅजिटीव पेशंट contact ट्रेसिंग साठी टिम लीडर म्हणून सध्या खारघर येथे अत्यंत प्रभावी पणे कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शना खाली सतत ५वर्षे शिष्यवृत्तीचा १००% निकाल तसेच एकाच वेळी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मध्ये जिल्हा गुणवत्ता यादित ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळाली.
जानेवारी २०२० मध्ये झालेल्या राज्य स्तरिय ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परिक्षेत इयत्ता दुसरी चे ३विद्यार्थी- २ सिल्वर मेडल व १ ब्राँझ मेडल . वर्गशिक्षक म्हणून महत्त्वाचे योगदानअसून लाॅकडाऊन मध्ये ऑनलाईन शिकवलेले शिक्षण इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांचा whatapp ग्रुप बनवून त्या ग्रुपवर दररोज वेगवेगळ्या Activity व घरचा अभ्यास देवून त्याचा आढावा घेणे.हे काम मे महिन्यापासून आजपर्यंत covid 19 ड्युटी सांभाळून करत आहेत.
पट संख्या वाढी साठी शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण, वर्गातील मुलानां स्वखर्चाने शाळेच्या पहिल्याच दिवशी दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप, बालदिनाच्या दिवशी, अल्पसंख्यांक दिनाच्या दिवशी मुलांनां शैक्षणिक साहित्य वाटप करणे, नेहमी उपस्थितीत राहणा-या मुलानां परिपाठामध्ये शाबासकी देणे हा उपक्रम, पालकांचा whatsapp ग्रुप बनवून पालकांशी नियमितपणे संवाद साधणे हा उपक्रम गेले अनेक वर्षे राबवित आहेत.
लोक संपर्कातून दरवर्षी अंदाजे रू.25000 पर्यंत वस्तू रूपाने मदत, स्वखर्चाने १० गरजू विद्यार्थ्यानां गणवेश वाटप, स्वखर्चाने गेली ३वर्षे ज्ञानरचनावादी वर्गसजावट, स्वखर्चाने mini projector व laptop चा वापर करून वर्गाला E-Learning शिक्षण याचा समावेश आहे. श्री. वैभव पाटील यांना पनवेल नगर परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून सतत तीन वर्षे रोटरी क्लब आॅफ पनवेल मार्फत NATION BUILDER AWARD ने सन्मानित केले गेले आहे. शाळा ISO मानांकित होण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले असून शाळेला पनवेल महानगरपालिकेची जनरल चँम्पियनशिप मिळविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. गेले ४ वर्षे २५ निकषानुसार प्रगत वर्ग व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेत महत्त्वाचे योगदान दिले असून आता पर्यत १४ वेळा रक्तदान पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यांनी घेऊन श्री.वैभव सिताराम पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री.वैभव सिताराम पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.