पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील म्हात्रे हॉस्पिटल लाईन आली येथे गटार आणि रस्त्याचे काम डिसेंबर 2021 रोजी काम चालू झाले एक वर्ष पूर्ण झाले तरी काम झाले नाही. याबाबत आज पनवेल महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला व सदर काम ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण न केल्यास १ जानेवारी २०२३ रोजी मोर्च्या काढण्याचा इशारा शहर प्रमुख प्रवीण जाधव यांनी दिला आहे.
येथील भोंगळ कारभाराबाबत शहर प्रमुख प्रवीण जाधव. शाखा प्रमुख संतोष तळेकर. जेष्ठ शिवसैनिक अरुण ठाकूर. खंदेश धनावडे. रोहित गुप्ते.रवी काळण. उरेकर साहेब. रवींद्र सुतार, गोविंद सुतार आदींनी महापालिकेचे इंजिनिअर महेश पाटील यांना प्रत्यक्ष त्याठिकाणी कामाची पाहणी करण्यास बोलवले होते.
सदर काम संदर्भात संजय कटेकर यांच्यासोबत चर्चा केली केली असता त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार असे सांगितले आहेत. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका केली नाही तर पनवेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नागरिकांना घेऊन महापालिकेवर मोर्चा काढेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शहर प्रमुख प्रवीण जाधव. शाखा प्रमुख संतोष तळेकर. जेष्ठ शिवसैनिक अरुण ठाकूर, खंदेश धनावडे.,रोहित गुप्ते, रवी काळण, रवींद्र सुतार, गोविंद सुतार, संदीप देशमुख, राजेंद्र सुतार आदी उपस्थित होते.