पनवेल (संजय कदम) : पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विधी व न्याय सेना या शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे ॲड. अमित बाळाराम पाटील यांच्या विजयाने पनवेल वकील संघटनेत खाते उघडले आहे. याविजयाबद्दल शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी ॲड. अमित पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अमित बाळाराम पाटील यांनी विजय मिळवत पनवेल वकील संघटनेत शिवसेनेचे खाते उघडले आहे. याबद्दल शिवसेना विधी व न्याय सेना तसेच संपूर्ण शिवसेना परिवारातर्फे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य ॲड. अमित बाळाराम पाटील तसेच या संपूर्ण निवडणुकीत शिवसेना विधी व न्याय सेनेच्या सदस्याला विजय प्राप्त करून देण्यासाठी विशेष मेहनत घेतलेले ॲड. सचिन म्हात्रे, ॲड. संगिता रोकडे आणि ॲड. अमर पटवर्धन यांचे कौतुक करीत अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.