पनवेल (संजय कदम) : बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा आज नवीन पनवेल येथे नवनिर्वाचित पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी ८० नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन संघटना वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले तसेच अनेकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे ,उपजिल्हा प्रमुख परेश पाटील,महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, शिवाजी थोरवे (शहर प्रमुख नवीन पनवेल खांदा कॉलनी), सुलक्षणा ताई जगदाळे , महनगर संघटक मंगेश रानवडे व इतर मान्यवर,पदाधिकारी,व शेकडो शिवसैनिक बंधू – भगिनी उपस्थित होते.