पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ६ सप्टेंबरपर्यंत मुदत हाेती़ 10 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी 45 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी 21 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 24 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
थेट जनतेतून सरपंचाची निवड हाेणार असल्याने चुरस वाढली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 75 उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहेत. त्यामुळे, आता 179 उमेदवार रिंगणात आहेत.
पनवेल तालुक्यातील मुदत संपलेल्या दहा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे़. सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे़ त्यामुळे, उमेदवारांची संख्या वाढली हाेती़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे काेण घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते.
अखेर सरपंच पदासाठी 21 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर सदस्य पदातील 75 उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहे. तर प्रत्यक्षात सरपंच पदासाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी 179 उमेदवार आपली लढत लढणार आहेत.
सदस्य पदसंख्या
एकूण ग्रामपंचायती – 10
सदस्य संख्या — 94
सदस्य पदासाठी 257 सदस्यांनी भरले अर्ज
छाननीमध्ये 254 अर्ज वैध झाले त्याचबरोबर 3 अर्ज अवैध झाले
यातील 254 अर्ज शिल्लक राहिले
यामध्ये 75 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले
यामध्ये 179 सदस्य उमेदवार रिंगणात आहेत
सरपंच पद
एकूण ग्रामपंचायत – 10
सरपंच पदसंख्या – 10 यामध्ये 45 जणांनी अर्ज भरले यामध्ये 21 जणांनी अर्ज मागे घेतले.
तर प्रत्यक्षात 24 सरपंच निवडणूक रिंगणात राहिले आहेत.