पनेवल येथे बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा; जाणून घ्या तारीख

rojgaar-melava
नवी मुंबई : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग व लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती याच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 ते 4.00 वा. पनवेल येथील पनवेल- उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  उप आयुक्त कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता  यांनी दिली.
या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्याचे प्रतिनिधी त्याच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार असून या 10 वी पास/नापास, 12 वी. आय. टी. आय, पदवी, पदविका, पदवीधर, अभियात्रिकी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उदयोजकांच्या आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार (मागणीनुसार) उमेदवारांची निवड केली जाईल.
मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी इच्छूक‍ उमेदवारांनी या विभागाच्या https://mahaswayam.gov.in  वेबपोर्टलला भेट देऊन व नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. मुलाखतीस येताना स्वतः चा बायोडाटा सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रासह वरील ठिकाणी उपस्थित रहावे. इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई विभागाचे उप आयुक्त कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *