जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्याजवळ मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 मजूर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी असून तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावलजवळ असलेल्या किनगाव इथं आज पहाटे पपईने भरलेल्या ट्रक उलटल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 15 मजूर ठार झाले आहे. धक्कादायक म्हणजे, यात एकाच कुटुंबातील 10 सदस्यांचा समावेश आहे.
धुळ्यातून MH-Z-3568 हा आयशर ट्रक पपई घेऊन हा रावेरला चालला होता. यावल जवळील किनगाव इथं पोहोचला असता अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. या ट्रकमध्ये पपई मोठ्या प्रमाणात भरलेली होती. ट्रक उलटल्यामुळे मागे बसलेले मजूर हे पपईच्या ढिगाराखाली सापडले असल्याची माहिती मिळत आहे. सर्व मजूर हे झोपलेले होते, त्यामुळे काही कळण्याच्या आता काळाने त्यांच्यावर झडप घातली.
या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, यात एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नेमका हा अपघात का आणि कशामुळे घडला याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.