पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पबजीसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास 100 हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती . यानंतर आता आणखी 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे.