परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक

aaropee1
पनवेल (संजय कदम) : रेल्वे पोलीस प्रशासन व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर, यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये पनवेल रेल्वे स्थानकातुन तीन इसमांना मदयासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरचा ९६ हजार ३२० रुपये किमंतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुनित विश्वनाथ खंडागळे, (वय ३४ वर्षे, उधना सुरत), राजन कुमार रामनाथ सिंग, (वय ४० वर्षे, चौरिआसी, जि. सुरत), गुलाम फरीद मोहम्मद शरीफ शेख, (वय ३० वर्षे चौरिआसी, जि. सुरत) अशी तिघांची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क, रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पुरळकर, निरीक्षक, पनवेल शहर, शिवाजी गायकवाड, प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक, व स्टाफ सुभाष जाधव, विलास चव्हाण, सुधीर मोरे, जवान, तसेच महिला जवान रमा कांबळे, यांना जसबीर राणा, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, पनवेल तसेच एस. एम. कोटवाल, निरीक्षक यांच्यासह पनवेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ वर उभ्या असलेल्या गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेस मधील जनरल कोच जी एस- १ ची दारुबंदी कायद्यांतर्गंत झडती घेतली.
सदर ठिकाणी तीन इसम त्यांच्या ताब्यात ९ बॅगा व २ मोठया आकाराच्या पिशव्यांसह ते संशयितरित्या बसलेले दिसून आले. त्यांच्याकडे बॅगांबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरच्या बॅगा त्यांच्या असल्याचे सांगितले. त्यांनी ते गोवा येथून आले असल्याचे व सुरत, गुजरात येथे जात असल्याचे सांगितले. या बँगांमध्ये गोवा बनावटीची दारु असून ती ते विक्रीच्या उद्देशाने घेवून जात असल्याचे सांगितले. बँगांमध्ये विविध ब्रँडच्या व विविध परिमाणाच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या तसेच बिअरचे पत्र्याचे सिलबंद टिन असल्याचे व सर्व प्रकारच्या मद्याच्या व बिअरच्या टिनवर फक्त गोवा राज्य विक्रीकरिता असा मजकूर निदर्शनास आले.
तीन इसमांच्या ताब्यातून परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरचा ९६ हजार ३२० इतक्या किमंतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल मिळून आला. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजी गायकवाड, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर – १, करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *