अलिबाग : राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान “ब्रेक द चेन” अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते.
त्यामुळे दुर्बल घटकांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी रु.1 हजार 500 एकवेळेचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ऑनलाईन पध्दतीने शेवटचा अर्ज दि.31 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त झाला होता. तसेच ऑफलाईन पध्दतीने दि.25 मार्च
2022 रोजी प्राप्त झाला.
त्यानंतर गेल्या 4 ते 6 महिन्यापासून या योजनेत एकही अर्ज प्राप्त न झाल्याने शासन मान्यतेने परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भात योजनेची ऑनलाईन प्रणाली शासनाद्वारे बंद करण्यात आली असून याबाबत सर्व रिक्षा चालक-मालक संघटनांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण श्री.महेश देवकाते यांनी कळविले आहे.