पागोटे गावात शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या प्रचार रॅली व सभेला तुफान प्रतिसाद

gadote1
उरण (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून पागोटे ग्रामपंचायत 2022 सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर 1 सरपंच व 9 ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी पागोटे गावातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिवसमर्थ परिवर्तन आघाडी स्थापन करून निवडणूक लढवित आहेत.
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यासाठी उभे असलेले  उमेदवार हे स्वच्छ चारित्र्यसंपन्न व प्रामाणिक उमेदवार आहेत. त्यांना समाजाप्रती तळमळ आहे. गावच्या सर्वांगीण विकासा साठी या शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून दया. असे आवाहन पागोटे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांनी केले.
शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या वतीने पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 पार्श्वभूमीवर दि 14/12/2022 रोजी सायंकाळी 6:30 वाजता श्रीगणेश हनुमान मंदिर पागोटे येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी मनोहर पाटील बोलत होते. तत्पूर्वी दुपारी 4 वा. प्रत्येक वार्डमधून शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचार केला. त्यानंतर 6:30 वाजता प्रचारसभेला सुरवात झाली.
सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार कुणाल अरुण पाटील (निशाणी कपबशी) यांनी शिवसमर्थ  शब्दांचा अर्थ सांगत पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये 18 तारखेला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका मध्ये शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. एका उमेदवाराला नव्हे तर सर्व उमेदवारांना निवडून द्या तरच गावचा विकास करणे शक्य होईल. असे सांगत शेवटपर्यंत सर्व जनतेने शिवसमर्थ परिवर्तन माघाडीच्या सर्व उमेदवारांना साथ दया. त्यांना निवडून आणा. असे आवाहन कुणाल पाटील यांनी केले.
आपल्या भाषणातून कुणाला पाटील यांनी गावच्या विकासाबाबत खेद व्यक्त केला. कुणाल पाटील म्हणाले की, द्रोणागिरी सीएफएस ,डी आर टी तसेच अनेक कंपन्या बंद पडल्या मात्र या बंद पडलेल्या कोणत्याही कंपन्या चालू करण्याचे काम कोणत्याही सदस्याने केले नाही,. गावात विकासाच्या नावाने फक्त गप्पा मारण्यात आले. जनतेची फसवणूक व दिशाभूल करण्याचे काम आजपर्यंत ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केलेले आहे. गावच्या विकासासाठी कोणीही प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसत नाही.बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. विविध समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.मी कोणावरही वयक्तिक टीका करणार नाही. मात्र निवडून आल्यानंतर मी गावच्या विकासासाठी मी 100%  प्रयत्न करेन. गावचा चेहरा बदलेन, वयाने मी लहान असलो तरी कामांच्या माध्यमातून मी माझी उंची दाखवण्याचा प्रयत्न करेन.मला एक संधी द्या. शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या या सर्व उमेदवारांना निवडून येण्याची संधी दया. तुमचे मत म्हणजे तुमचा आशीर्वाद , तुमचे मत म्हणजे विकासाला साथ असे सांगत सर्वांना निवडून देण्याचे आवाहन कुणाल पाटील यांनी केले.
यावेळी प्रचारसभेत निवडणूकीसाठी उभे असलेल्या शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांनी व्यासपीठावर येऊन आपली ओळख सांगीतली व गावच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल या विषयी प्रत्येक उमेदवारांनी आपले मत मांडले. पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 साठी
वार्ड क्रमांक 1 मधून सुजित हसुराम तांडेल (निशाणी बॅट ) यांनी आपल्या भाषणात पागोटे गावातील बेरोजगांराची व्यथा मांडली व मला निवडून दिल्यास पागोटे गावातील जास्तीत नागरिकांना रोजगार देईन असे सांगीतले.पागोटे गावातील कोणतेही व्यक्ती बेरोजगार राहणार नाही असे आश्वासन यावेळी सूजित तांडेल यांनी दिले.
वार्ड क्रमांक 1 चे सदस्य पदाचे उमेदवार समृद्धी तुळशीराम तांडेल (निशाणी कपाट ) यांनी गावच्या विकासासाठी आम्ही शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व उमेदवार उभे असून गावच्या विकासासाठी आम्हाला सर्वांना निवडून दया असे आवाहन केले.
वार्ड.1 चे सदस्य पदाचे उमेदवार सतीश ज्ञानेश्वर पाटील(निशाणी ऑटोरिक्षा) यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. मला कोणताही राजकीय वारसा नाही परंतु मला निवडून दिल्यास गावच्या विविध समस्या सोडविण्यास नक्कीच प्राधान्य देईन.
वार्ड क्रमांक 2 चे सदस्य पदाचे उमेदवार करिश्मा गणेश पाटील (निशाणी टेबल ) यांनी महिला आता चूल आणि मूल पुरते मर्यादित न राहता सर्वांगीण विकास पुढे येत आहेत.आम्हा सर्वांना एकदा तरी संधी दया. त्या संधीचे आम्ही सोने करू असे सांगितले.
वार्ड क्रमांक 2 चे सदस्य पदाचे उमेदवार प्राजक्ता हेमंत पाटील(निशाणी बॅट )यांनी गावात विविध विकासनिधीच्या माध्यमातून विविध योजना राबवून जनतेचा विकास करण्याचे आश्वासन दिले. लोकांचे विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आपल्या भाषणात प्राजक्ता हेमंत पाटील यांनी दिले.
वार्ड क्रमांक 2 चे सदस्य पदाचे उमेदवार अधिराज किशोर पाटील (निशाणी कपाट ) यांनी आपली ओळख सांगत आपण निवडून आल्यास जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिराज किशोर पाटील यांनी आपल्या भाषणातून दिले.
वार्ड क्रमांक 3 सदस्य पदाचे उमेदवार सोनाली दिनेश भोईर (निशाणी कपाट ) यांनी महिलांचे विविध प्रश्न सोडविण्याचे तसेच जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
वार्ड क्र.3 चे सदस्य पदाचे उमेदवार सुनिता विश्वनाथ पाटील(निशाणी छताचा पंखा )यांनी आज गावात अनेक प्रश्न आहेत मात्र ते प्रश्न सुटत नाहित आम्हाला निवडून दिल्यास आम्ही ते प्रश्न नक्की सोडवू असे सांगितले
वार्ड क्रमांक 3 चे सदस्य पदाचे उमेदवार मयूर भालचंद्र पाटील (निशाणी बॅट ) यांनीही आपल्या भाषणात गावच्या विविध समस्या व त्या समस्या सोडविण्यासाठी आपण काय करणार आहोत हे स्पष्टपणे सांगीतले व गावच्या विकासासाठी निवडूण देण्याचे आवाहन केले.
यावेळी गावचे ग्रामस्थ असलेले माजी प्रभारी सरपंच सुमित चंद्रकांत पाटील,संकेत तांडेल, विवेक पाटील, गणेश पाटील, अतिश पाटील तसेच ग्रामस्थांनी गावच्या समस्यांवर प्रश्नांना हात घालून गावचा विकास आजपर्यंत झाला नसल्याचे सांगितले. विकास करायचा असेल तर शिव समर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून उभे असलेल्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार विवेक पाटील यांनी मानले.
शासनाचा करोडो रुपयाचा निधी मिळुनही गावचा विकास न झाल्याने पागोटे गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतच्या कारभारावर नाराज आहेत. स्मशान भूमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. महिलांना व्यायामशाळा नाही. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य गोर गरिबांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत.विविध विकासकामे ग्रामपंचायत हद्दीत झालेली नाहीत.या अगोदर निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्यांनी कोणालाही विश्वासात न घेता कारभार केल्याने पागोटे गावातील ग्रामस्थ त्या सदस्यांवर नाराज आहेत.विरोधकांजवळ विकासाचे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यांच्या रॅलीला सुद्धा जनतेचा कमी पाठिंबा आहे.
त्यामुळे या सर्व गोष्टीचा फटका पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या विरोधकांना (उमेदवारांना )बसणार आहे.मतदारांचा कौल निवडूकीच्या निकालाने दिसणार आहे.शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार हे नवीन, स्वच्छ चारित्र्य संपन्न व प्रामाणिक असल्याने शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या सरपंचासह सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील असा आत्मविश्वास शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *