नागोठणे (महेश पवार) : नागोठणे जवळील पाटणसई ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या दोन वर्षापूर्वी पार पडली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व शेकाप आघाडीच्या रोहा पं. स. चे माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते सदानंद गायकर यांच्या सौभाग्यवती माधवी सदानंद गायकर या सरपंचपदी विजयी झाल्या होत्या. तद्नंतर उपसरपंचपदी लिंबाजी पिंगळा यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.
आपली दोन वर्षाची कारकिर्दी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पक्ष श्रेष्ठींनी ठरवल्यानुसार लिंबाजी पिंगळा यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच माधवी गायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार झाली. यामध्ये पाटणसई ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेचे सुरेश गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा सल्लगार राजिप सदस्य किशोर जैन, रोहा प. स. चे माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते सदानंद गायकर, माजी राजिप सदस्य सखुबाई पिंगळा माजी उपसरपंच लिंबाजी पिंगळा, सचिन कळसकर, दिपक महाडिक, ऐश्वर्या अशोक कोतवाल, खेळीबाई सहदेव कोतवाल, मिना हेमंत दरवडा, ज्योती राम बोडेकर, बेबी नारायण शिंगवा. ग्रामसेविका शर्मिला आर. ठाकुर, माजी सरपंच झिमाशेठ कोकरे, माजी उपसरपंच पांडुरंग गायकर, गणपत पिंगळे, तंटामुक्त अध्यक्ष मदन गायकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष अकबर पठाण, हेमंत गायकर, पुंडलिक ताडकर, महेश वाघमारे, जनार्दन गायकर, काशिनाथ ढाणे, राष्ट्रवादी ता. अध्यक्ष विजया कोतवाल, शंकर कोतवाल, प्रल्हाद राणे, दत्ता गायकर, अशोक कोतवाल आदींसह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.