नागोठणे (महेंद्र माने) : पायल राजेंद्र मोदी हिने चार्टड अकाऊंटच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सुयश संपादित केले आहे. तिच्या या यशाबद्द्ल नागोठणे विभागातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अग्रवाल समाज नागोठणे विभागातील चार्टड अकाऊंट झालेली पहिली मुलगी पायल ही लहानपणापासून अतिशय हुशार असून ती नागोठणे जवळील वाकण या छोट्याशा गावात रहात आहे. तिने पहिली ते दहावीचे शिक्षण नागोठणे येथील भा.ए.सो.च्या परमार विद्यालयात, 11,12 वी अलिबाग येथील अरुणकुमार वैद्य महाविद्यालय तसेच पुणे येथील महाविद्यालयातून बी कॉमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने पुणे येथून अतिशय कठीण अशी चार्टड अकाऊंटची परीक्षा देऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सुयश संपादित केले. तिच्या या यशाबद्द्ल नागोठणे विभागातून तिचे कौतुक होऊन तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशामागे माझे वडील राजेंद्र मोदी व आई अल्पना मोदी यांची मेहनत असल्याचे पायल मोदी हिने सांगितले.