अलिबाग : छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे तरुणाईचा आदर्श अर्थात युवा शक्तीच्या आयडॉल तसेच उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या राज्यमंत्री व रायगडच्या
पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांचा तरुणाईचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांचा मंत्रीपदाचा आजपर्यंतचा प्रवास व कर्तृत्व सगळ्यांनाच थक्क करणारे आहे. प्रत्येक जबाबदारी सर्वांना सोबत घेवून यशस्वीपणे पार पाडण्याची त्यांची हातोटी, करोनाचे संकट असो वा निसर्ग चक्रीवादळाचे संकट, पालकमंत्री कु.आदिती तटकरे समाजसेवेचा वसा घेऊन दिवसरात्र सर्वसामान्य जनतेच्या मदतीला तत्परतेने हजर राहिल्या. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे कु.आदिती सुनील तटकरे यांना “तरुणाईचा आदर्श पुरस्कार 2021” ने आज सन्मानित करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक तसेच राजेश जाधव, विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, सदाशिव मोरे, सचिन गायकवाड, मनोज पडवळ आदी उपस्थित होते.