अलिबाग : राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे…..
शुक्रवार दि.18 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन व महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 1.30 वा. जिल्हास्तरीय प्रलंबित विषयांबाबत बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 3.00 वा. “माझं कुटुंब-माझी जबाबदारी” कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमाच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 3.45 वा. “माझ कुटुंब-माझी जबाबदारी” कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत अलिबाग येथे नगरपरिषद क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 4.30 वा. मऔविम विश्रामगृह अलिबाग येथे राखीव. सायं. 5.00 वा. अलिबाग येथून वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. सुतारवाडी, ता.रोहा येथे आगमन व राखीव