पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीला यश

मंत्रिमंडळ बैठकीत सुपारी आणि नारळ प्रति झाडांसाठी मदत देण्याचा झाला निर्णय

अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):- निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नारळ व सुपारीच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रति झाड मदत मिळावी, याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाकडे मागणी केली होती.

त्यानुसार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपारीच्या प्रति झाडासाठी रू.५० व नारळाच्या प्रति झाडासाठी रू. २५० अशी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबद्दल पालकमंत्री कु.तटकरे यांनी रायगडकर जनता आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.