पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचं निधन !

laxman-jaktap
पुणे : पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळीच ही दुःखद घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.
जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

 प्रभावी नेतृत्व हरपलं..

  •  पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.
  •  1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • त्यानंतर 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला.
  • पिंपरी चिंचवडचे महापौरपद त्यांनी दोन वेळा भूषवलं तर एकदा स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले.
  •  2004 साली ते विधानपरिषदेचे सदस्य बनले.
  •  2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला. अपक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
  • 2014 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढले. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यासमोर त्यांना हार पत्करावी लागली.
  •  यानंतर लक्ष्मण जगताप यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 ची विधानसभा निवडणूक लढली. विजयी झाले आणि त्यानंतरी 2019 मध्येही त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *