पिल्लई एच.ओ.सी. रसायनी कॉलेजला मिळाली A+ ग्रेडची मान्यता

pillai-college
पनवेल (संजय कदम) : पनवेल जवळील रसायनी येथील पिल्लई एच.ओ.सी. कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्सला NAAC द्वितीय खंडात A+ ग्रेडसह मान्यता पुन्हा मिळाल्याने संस्थेसह विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या संदर्भात महात्मा एज्युकेशन सोसायटीचे संचालक वासुदेवन पिल्लई यांनी माहिती दिली.
महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई एच.ओ. सी. कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, रसायनीला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अर्थात NAAC द्वारे त्यांच्या द्वितीय खंडातील मूल्यांकन प्रक्रीयेनंतर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात A+ हे मानांकन मिळाले आहे.  त्यानिमित्त मान्यता देखरेख समितीने कॉलेजला भेट दिली आणि विविध भागधारकांशी चर्चा केली.
सदर समितीने अभ्यासक्रमाचा दर्जा, अनुशासन, नेतृत्व, व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये यांचा उच्च दर्जा याची वाखाणणी केली. सदर समिती कॉलेजने सुरु केलेल्या विस्तार कार्यक्रम तसेच पायाभूत सुविधा पाहून प्रभावित झाले. पिल्लई एच.ओ.सी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स हे महाविद्यालय रसायनी या ग्रामीण भागात वसलेले असून राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अभिरुचीची पूर्तता करते.
सर्वांगीण शिक्षणाच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी महाविद्यालय ग्रामीण भागात असलेल्या गैरसोयी पलीकडे जावून विविध विषयांमध्ये दर्जेदार शिक्षण देत आहे. याबाबत A+ मानांकन मिळाल्याबद्दल पिल्लई एच.ओ.सी. कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य डॉ. लता मेनन म्हणाल्या की, A+ मानांकन हे मुल्यांकन आमच्या शैक्षणिक प्रयत्नांची, विस्ताराची आणि उपक्रमांची पोचपावती असल्याचीच साक्ष आहे.
आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब असल्याचे सांगून. सदर मान्यता पुढील पाच वर्षांसाठी वैध असेल अशी माहिती दिली. यावेळी पिल्लई एच.ओ.सी. कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य डॉ. लता मेनन, डॉ.जे.डब्लू.बकल, पिल्लई एच.ओ.सी. इन्स्टिट्यूट ऑफ मॉनेजमेंट, अँड रिसर्च, रसायनी चे डायरेक्टर डॉ. पी.चॅटर्जी, मॉनेजमेंट इन्स्टिटयूट पनवेलचे डॉ चंद्रन, पिल्लई एच.ओ.सी. पॉलीटेकनिकचे प्राचार्य प्रा.अमन मांगे यांच्यासह शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *