पी.एस.आय. गणपत पिंगळे यांचे निधन, मरणोत्तरानंतरही अवयव दान करून खरी केली जनसेवा

pingale
नागोठणे (महेंद्र माने) : रोहा तालुक्यातील डोंगर माथ्यावरील पिंपळवाडी,वासगाव येथील ठाकुर समाजासाठी अहोरात्र झटणारे जनसेवक तसेच ठाकुर समाजाचे पहिले पी.एस.आय. गणपत अंबाजी पिंगळे यांचे वयाच्या 58 व्या वर्षी अल्पशा आजाराने बुधवार दि. 30 नोव्हेंबर रोजी निधन झाले. समाजाची जनसेवा करणारे गणपत पिंगळे यांनी मरणानंतरही आपले अवयव दान करून खरी जनसेवा केली आहे.
पिंपळवाडी, वासगाव या डोंगर माथ्यावरील तसेच नागोठणे विभागातील कष्टकरी ठाकुर समाजातील एक कर्तृत्ववान नेतृत्व, ठाकुर समाजाचे पहिले पोलीस खात्यातील पी.एस.आय. अभ्यासु व्यक्तिमत्त्व कडेकपारीत राहणा-या माझे भाऊबंद तसेच येथील लोकांसाठी काहीतरी कराव हा हट्टाहास,समाज एकत्र राहावा यासाठी समाजातील भांडणे,मतभेद कांबल्यावरच सोडवणे, तरुणांना सरकारी नोकरी, उद्योगधंदे, योजना याबाबत मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, माझा डोंगर,दरीतील बांधव पुढे कसा जाईल हे त्यांनी कटाक्षाने पाहून शिक्षण घ्या,सरकारने ज्या योजना दिल्यात त्याचा लाभ घ्या हे त्यांच समाजाला आर्वजुन सांगणे, सतत डोळ्यासमोर समाजाचेच हित जोपासणारे गणपत पिंगळे या जनसेवकाने आपल्या निधनानंतर आपल्या शरीराचे सर्व अवयव गरजावंतांना उपयोगी पडावे यासाठी दान करुन मरणानंतरही खरी जनसेवा केली आहे.
अवयव दान करणारे ते समाजातील पहिली व्यक्ति असून त्यांनी केलेले त्याग व आदर्श समाजासाठी भुषणाधीन आहे. यांच्या पार्थिवावर गुरुवार 01 डिसेंबर रोजी पिंपळवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात निर्मला पिंगळे या पत्नी, प्रदीपकुमार पिंगळे हा मुलगा, विजया प्रशांत घासे, करुणा लोभी व सुवर्णा वाघ या विवाहित मुली तसेच सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशविधी क्रियाकार्य शनिवार 10 डिसेंबर रोजी उद्धर – पाली येथे तर उत्तरकार्य मंगळवार 13 डिसेंबर रोजी पिंपळवाडी येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती पिंगळे कुटुंबियांनी दिली आहे.
———————
आपल्या शोक संदेशात मुंबई पोलीस दलातील धडाडीचे अधिकारी गणपत पिंगळे यांचे अकस्मात निधन झाले. निधनाची बातमी ऐकुन अतीव दुःख आले. त्यांनी मुंबईत पोलिस खात्यात कर्तव्यावर असताना देखील आपल्या गावची नाळ कायम जपली आहे. त्यांनी नेहमीच मी केंद्रीय मंत्री असताना नागोठणे-वासगाव व-पिंपळवाडी रस्त्याचे डांबरीकरण असो किंवा त्या परिसरातील विकासकामांसाठी यशस्वी पाठपुरावा असून त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक सहकारी, मित्र गमावला आहे. तसेच त्यांच्या जाण्याने ठाकुर समाजाचे मोठे नुकसान झाले असून, यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ही ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहे.
—अनंत गीते, शिवसेना नेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *