कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यात 5 ग्रामपंचायतीच्या निवडणूका येत्या 18 डिसेंबर रोजी होत असुन यामधे नेहमीच बहुचर्चेत असलेल्या पुई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही तुल्यबल्य उमेदवार सामोरा समोर उभे ठाकल्याने सामना चुरशीचाच असल्याचे बोलले जात असून यात कोण बाजी मारणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे..
रायगड चे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या आंबेवाडी जि प मतदार संघातील व कोलाड पासुन हाकेच्या अंतरावरिल सदरची पुई ग्रामपंच्यायत आहे. जुन्या बुजुर्ग मंडळीनी सुनिल तटकरे यांना या ग्रामपंच्यायतीत राजकिय ताकद दिली होती. मधला काही काळ पुई ग्रामपंच्यायत शेकाप च्या ताब्यात होती. मात्र तरुण मतदार झाल्यानंतर बदल होत. ही ग्रामपंच्यायत आज पर्यन्त राष्ट्रवादी च्या अधिपत्याखाली असल्याचे बोलले जात आहे .
तर सध्या केंद्रात मोदीचे राज्य आहे, व महाराष्ट्रात देखील भाजपा व शिंदे गट यांचे राज्य असल्याने जशी वरच्या राजकारणात जशी हवा बदलते तसे ग्रामपंच्यायत निवडणुकीत देखील मतदार सुशिक्षीत असल्याने या ठिकाणी काही ही घडू शकते.
पुई ग्रामपंच्यायतीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून रुषाली संजय मांडलूस्कर तर विरोधी पक्षाकड़ुन अस्मिता अनंत सानप हे दोन थेट उमेदवार समोरा समोर रिंगणात उभे आहेत. दोन्ही उमेदवार यांचे पती तुल्यबल्य आहेत. अनंत सानप हे देखील राष्ट्रवादी पक्षामधे होते. मात्र त्याना उमेदवारी दिली नाही त्यामूळे त्यानी राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी करित आपल्या पत्नीला उमेदवारी रिंगणात उतरवले आहे. व राजकिय लढाईस सज्ज झाले आहेत अनंत सानप यांचा गावात सामजिक दबदबा आहे.
तर राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनिल तटकरे व ताई, भाई यांचे विश्वास अल्प काळात संपादित केला.व त्यांचे खुप मोठे पाठबल ज्याच्या पाठीशी आहे. असे सर्वाना सुपरिचित असे संजय मांडलूस्कर यानी अपल्या पत्नीला उमेदवारी रिंगणात उतरविले आहे. त्यांचा जनसंपर्क खुप आहे. नेहमीच गावातील तरुण वर्ग व सामजिक कार्यात सहभागी असतात मात्र गावच्या थेट कारभारात कोण बाजी मारणार हे मात्र मतदारच ठरवू शकतो .
सदरचा संपन्न होत असलेल्या थेट निवडणुकीत एकंदरीत तुल्यबल्य उमेदवार सामोरा समोर उमेदवारी रिंगणात उभे राहिले आहेत. त्यातच थेट सरपंच निवडणूक असल्याने निवडणूकित कोण बाजी मारेल हे सांगणे कठिण आहे.
पुई ग्रामपंच्यायतीत दोनी उमेदवार हे वजनदार व संपर्कातले असल्याने दोन्ही नेत्यांच्या पाठी लोकांचा राबता दिसत आहे. त्यामूळे पुई ग्रामपंच्यायतीत कोन बाजी मारणार याची सर्वत्र चर्चा असुन या ग्रामपंच्यतीच्या निकालाची उस्तूकता सर्वाना लागुन राहिली आहे.