नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले की, काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष गांधी कुटुंबाच्या बाहेरील असावा. मी राहुल गांधी यांच्याशी पूर्ण सहमत आहे, त्यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देताना म्हटले होते की, गांधी कुटुंबाच्या बाहेरील कुणाला तरी अध्यक्ष करायला हवे.
प्रियंका गांधी यांनी म्हटले, राहुल गांधी यांनी म्हणाले होते की आमच्यापैकी कुणी पक्षाचा अध्यक्ष होऊ नये. मी राहुल यांच्या मताशी सहमत आहे. मला वाटते पक्षाने आता आपला मार्ग शोधयला पाहिजे.
प्रियंका गांधी यांचे हे वक्तव्य कन्व्हर्सेशन्स विथ द नेक्स्ट जेनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स, नावाच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहे