पेट्रोलचे दर आज पुन्हा वाढले, डिझेलचे दर स्थिर

मुंबई : पेट्रोलचे दर मागील तीन दिवसांपासून सतत वाढत असून आज पुन्हा एकदा दरात वाढ झाली आहे. काल दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आदी शहरात 17 ते 11 पैसेपर्यंत पेट्रोलचे दर वाढवले होते. आज डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

आज तेल कंपन्यांनी सर्व शहरात पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. बुधवारी मुंबईत पेट्रोल 87.58 रुपये प्रति लीटर दराने तर डिझेल 80.11 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.