पेणच्या एसटी डेपोत लाखो रुपयांचा पास घोटाळा, 3 कर्मचारी निलंबित

पेण : पेण  एसटी आगारामध्ये लाखो रुपयांचा पास घोटाळा उघडकीस आला आहे. पेण एसटी स्थानकातील वाहक जनार्दन गंगाराम म्हात्रे, जितेंद्र जयेंद्र देशपांडे, रमेश भाऊराव पाटील अशी या तिघांची नावे आहेत या सर्व  कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

एसटीमध्ये प्रवाशांना पास देताना एकाच पाचच्या 3 प्रती बनविल्या जातात. एक प्रत प्रवाशाला दिली जाते तर दुसरी प्रत अकाउंट विभागाला पाठवली जाते व तिसरी प्रत आगार कार्यालयात ठेवली जाते. यावेळी पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पहिल्या दोन प्रतींवर प्रवाशांची नोंद केली व तिसरी प्रत मात्र कोरी ठेवली. सदरची तिसरी प्रत दुसऱ्या प्रवाशाला देऊन त्या रक्कमेची अफरातफर करण्याचा प्रकार घडला आहे.

आपला घोटाळा समोर येऊ नये म्हणून पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या दिलेल्या पासचे अनेक बुकही गहाळ केले. या आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे.