पेणच्या गणेश मूर्तीकारांची व्यथा खा. तटकरे यांनी मांडली केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याकडे

पेण :  कोरोना महामारीच्या संकटामुळे पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायावर अतिशय गंभीर परिणाम झाला आहे. असंख्या मूर्तीकारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी ही बाब खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खा. तटकरे यांनी ताताडीने दखल घेऊन पेणच्या मूर्तीकारांच्या व्यथा मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले.

मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिलेल्या निवेदनाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पेण तसेच रायगड जिल्ह्यातील इतर भागांतून जगभर मागणी असलेल्या सुप्रसिद्ध गणेश मूर्तींची मागणी ओसरली. त्यामुळे 100 वर्षांहून अधिक काळ वडिलोपार्जित हे काम करणार्‍या गणेश मूर्तीकारांचे मोठे नुकसान झाले आहे. एक हजारांहून अधिक कारखान्यांमध्ये 2.50 लाखांहून अधिक कारागिरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीमुळे या माध्यमातून निर्माण होणार्‍या रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी होतील. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच, रोजगार व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नियमावलीत काही बदलही सुचवले