पेणमधील बळवलीच्या अजय पाटीलचा विक्रम!; ५ तासात मारले ५५५५ जोर   

santosh7

पेण ( संतोष पाटील ) :  पेण तालुक्यातील बळवळी येथील २६ वर्षीय अजय कमलाकर पाटील या तरुणाने ५ तासात ५ हजार ५५५ जोर (पुशअप) काढून विक्रम केला आहे. हनुमान व्यायामशाळा पेण व श्री फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी अजय पाटील याने  जोर मारण्यास सुरुवात केली. या दरम्यान गावातील सहकारी मित्रानी त्याला प्रोत्साहन देत त्याच्याबरोबर जोर मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर १ हजार, २ हजार, ३ हजार चा आकडा पार करता करता दुपारी १२ वाजून ३० मिनिटाने त्याने ५ तासात ५ हजार ५५५ जोर मारून एक नवा विक्रम केला असल्याचे सांगण्यात आले. सूर्यनमस्कार प्रशिक्षक डॉ. अशोक भोईर यांच्या परीक्षणाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी हनुमान व्यायाम शाळेचे प्रशिक्षक राजेश अनगत, दशरथ भोपतराव, कुस्तीगीर संघाचे दत्ता पाटील, हरिश्चंद्र शिंदे, दीपक सोनावणे हे उपस्थित होते. डॉ. अशोक भोईर यांनी अजय पाटील यास रोख ५ हजार ५५५ रुपये  तसेच हरिश्चंद्र  शिंदे यांनी ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला.

यावेळी बोलताना अजय कमलाकर पाटील याने सांगितले कि, आपले आई-वडील व नरेंद्र माऊली यांच्या कृपाशीर्वादने आज मी हे ध्येय पूर्ण करू शकलो माझ्या यशात सूर्य नमस्काराचे गुरुवर्य डॉ. अशोक भोईर, प्रशिक्षक राजेश अनगत सर, भोपतराव महाराज तसेच माझे सहकारी यांच्या प्रोत्सहानमुळे ही स्पर्धा यशस्वी पार करू शकलो. गेली ५ वर्षांपासून मी सराव करीत असून दररोज ७ कि.मी. धावणे, जोर मारणे असा नित्यक्रम असतो. स्पर्धेतूनच आपल्या बळवली गावाचे नाव देशात व देशाचे नाव जगात करण्याचा मानस असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले