पेण (राजेश प्रधान) : पेण शहराच्या नजीक आंबेगावाच्या हद्दीत परप्रांतीयांनी अश्लील गाण्यांवर बाया नाचवण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. पेण शहराच्या उज्वल परंपरेला डाग लावणाऱ्या परप्रांतीयांच्या विरोधात शिवभक्त पेटून उठले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,पेण येथील आंबेगाव हद्दीतील अजय सहानी या परप्रांतीय युवकाच्या घरासमोरील आवारात परप्रांतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात युपी, बिहार येथील महिला नाचवण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. डीजेच्या तालावर या महिला अश्लील हावभाव करून नाचत होत्या.
सदर प्रकार शिवभक्तांच्या लक्षात येताच पेणमधील सह्याद्री सेवक, स्वराज्य सेवक व आंबेगाव येथील शिवभक्त तरुणांनी जाऊन नाच गाण्याचा कार्यक्रम उधळून लावला. महाराष्ट्राची संस्कृती जपा अन्यथा परिणामांना सामोरी जा. अशी थेर आमच्या मराठी मातीत चालू देणार नाही अशी तंबी या शिवभक्तांनी आणि स्वराज्य सेवकांनी परप्रांतीय नागरिकांना दिली.
आयोजक अजय सहानी याने स्थानिकांची व मराठी नागरिकांची जाहीर माफी मागितली. पुन्हा अशी चुकी होणार नाही याची ग्वाही दिली.