अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने पेण, अलिबाग आणि नागोठणे औद्योगिक वसाहतीच्या भागातील 26 किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 17 कोटींच्या निधीस मंजूरी मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
श्री.सामंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक येण्यास्तव शासन कटिबद्ध असून या भागातील पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. उद्योगांच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहेत.
पेण, अलिबाग आणि नागोठणे औद्योगिक वसाहतीच्या भागातील ही रस्त्याची कामे एमआयडीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार आहेत, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे .