पेण : पेण अर्बन बँकचे दोन लाख ठेवीदारा १० वर्षे होऊनही न्यायाच्या प्रतीक्षेत, धक्कादायक बाब म्हणजे बंदि घातली असतानाही, घोटाळ्यातील आरोपीच्या मालमत्तेचे व्यवाहार सुरु असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. मात्र याबाबत कोणतीही दाखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या खातेदारांनी ७ सप्टेंबरला जिल्हाधेकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकत ७५० कोटी रुपयांचा घोटाळा होऊन दहा वर्षे झाली. दादर, गिरगाव, विलेपार्ले आणि रायगड जिल्हयात १८ शाखा असलेल्या या बँकेत १ लाख ९८ हजार ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत.
पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी विविध प्रकारे आंदोलने, निदर्शने, उपोषणे केली, पण अद्यापपर्यंत ठेवी परत मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ठेवीदारांनी सोशल डीस्टन्सिंगचे पालन करूत पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.