पेण (राजेश प्रधान) : पेण येथील साठे क्लासेसचे नीरज साठे यांनी त्यांच्या क्लासमधील ५ वी ते १० मधील मुले/मुली असे एकूण ९० जणांना ३ बसने रविवारी मावळ तालुक्यातील लोहगड किल्यावर सहली करता घेऊन गेले होते. नीरज साठे यांनी हि ट्रिप आयोजित केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सायंकाळी परतीच्या प्रवासादरम्यान घेरेवाडी येथील उतारावरून बस क्रमांक MH06S9381 या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने बस 300 फुट दरीत पडली.
दरम्यान या अपघाताची माहिती पेण मधील उद्योजक व समाजसेवक राजू पिचीका यांना समजताच त्यांनी 2 रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी पाठवल्या. या रुग्णवाहिकेतून अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले व प्रथम उपचार करण्यात आले. या रुग्णवाहिकांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.
या अपघातामधील जखमी यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
जखमींची नावे :-
परमार हॉस्पिटल, लोणावळा
१) जितेंद्र परशुराम पाटील वय ४२ रा शिर्की, पेण जि रायगड (ड्रायव्हर:- कमरेला किरकोळ लागले आहे.
२) राजेश मोहन म्हात्रे वय २५ रा लाखोले पेण (केअर टेकर:- परमार येथे ऍडमिट आहे. डोक्याला मार लागलेला आहे. बोलत आहे)
संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा
३) मनस्विनी तेजस मनकवडे वय ११ रा झीराळआळी पेण (डाव्या खांद्यालाकिरकोळ मार लागलेला आहे)
४) प्रज्ञा धीरज पाटील वय १३ रा चावडी नाका पेण (पोटाला किरकोळ मार लागलेला आहे)
५) इशांन समीर मनकामे वय १२ रा चावडीनाका जवळ पेण (डावे हाताला पोटरीवर टाके आहेत.)
६) सौ स्नेहा सुमन गोखले वय ३६ रा चावडी नाका पेण (पायाला किरकोळ मार लागलेला आहे. ह्या अडकलेल्या होत्या)
७) आदिती विष्णू देवधर वय १४ रा पेण सदर (डावे हातास मार लागलेला आहे )
काले सरकारी हॉस्पिटल, पवनानगर
८) शिवम संतोष कदम वय २२ रा पेण (डावे पायाचे टाचेजवळ)
९) पूजा गजानन पाटील वय १७ रा प्रभूआळी पेण (उजव्या हाताच्या मनगटजवळ)
याव्यतिरिक्त ५/६ मुलांना किरकोळ खरचटलेले असून त्यांना ड्रेसिंग करून सोडलेले आहे. राजेश मोहन म्हात्रे वय २५ यांच्या डोक्याला मार लागला आहे. खबरदारी म्हणून त्याचे सिटीस्कॅन करण्यात आले.