पेण तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाची सभा संपन्न..

पेण (सुनील पाटील ) : काल  दि.१८ सप्टेंबर रोजी पेण तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाची सभा महात्मा गांधी मंदिर वाचनालय पेण येथे संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने समाजाची पुढील वाटचाल व दिशा काय असावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पेण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. सदर सभेमध्ये जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारी नोकरी भरती करू नये. शिक्षणात विद्यार्थ्यांना ॲडमिशन व सवलत मिळावी या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. तसे लेखी निवेदन तहसीलदार, प्रांताधिकारी व पोलिस ठाणे येथे देण्यात येईल असे ठरले.

शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडावी यासाठी हे निवेदन दिले जाणार आहे. यापुढे कोणताही निर्णय नाही मिळाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल असे ठरविण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पेण तालुका अध्यक्ष रुपेश कदम, सुनील(आप्पा) सत्वे ,अविनाश पाटील (निधवली), अखिल भारतीय मराठा महासंघ नाणेगावचे अध्यक्ष माधव नाईक, मराठा समाज ग्रामीण विभागातील सल्लागार प्रतिनिधी अशोक पाटील(बोरगाव), सुभाष टेंबे (आंबेघर),विष्णू कदम (गणपती वाडी),दिनेश खामकर(धावटे)

पेण शहर पदाधिकारी
अनंत सावंत,अनिल देशमुख,प्रशांत सावंत,गिरिजात्मक साळवी,आनंद निंबरे, नितीन चव्हाण ,गणेश चव्हाण ,हर्षल पारंगे ,वैभव गायकर ,आदित्य शिंदे ,विश्वास शिंदे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.