पेण ( राजेश प्रधान ) : पेण तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्याने आज गुरुवार रोजी सकाळी रविराज फार्म हाऊस येथे पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले. यामध्ये (अनु.जाती आरक्षित जागा)
महिला- गागोदे खुर्द ,(अनु .जमाती आरक्षित जागा) – (खुला)- वळवणे, रोडे ,जिर्णे, कामार्ली, पाटणोली, वाशिवली, शिहू
महिला- सापोली, आंबिवली, आंबेघर ,शेडाशी, करंबळी छत्तिशी, बोरगाव, कोपर (ना.मा. आरक्षित जागा) -(खुला)- खारपाले , सावसर्ई, निधवली, करोडी, झोतिर पाडा, डोलवी, कोपरोली, कांदळे, कोलेटि,
महिला- काराव, दुष्मी, जोहे, कुहीरे, कासू हालमिर्या डोंगर, दादर, जिते
(सर्वसाधारण )-(खुला) –
दुरशेत, शिर्की, वाकरूळ ,रावे ,वाशी ,मसद बुद्रुक, वरेडी. आमटेम, सोनखार, उंबर्डे ,अंतोरे, वरप, हमरापुर, बेलवडे बुद्रुक, वढाव, कळवे.
(महिला) – जावळी ,कडे, खरोशी, निगडे, काळेश्री, दिव, बोर्झे,मुंढाणी,वरसई,मळेघर, वडखळ,पाबळ, तरणखोप, बेनसे ,बळवली, बोरी,या ६४ ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण प्रांत विठ्ठल इनामदार यांनी जाहिर केले
याप्रसंगी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सन २०२१-२०२५ सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर केले.त्यांच्या समवेत यावेळी तहसीलदार अरुणा जाधव, नायब तहसीलदार धनंजय कांबळे व सुनील जाधव तसेच शासकीय कर्मचारी, पंचायत समिती सदस्य नगरसेवक सरपंच,उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.