पेण तालुक्यात कोरोनाचे 32 नवे रूग्ण, एकाचा मृत्यू

पेण : पेण तालुक्यात काल कोरोनाचे 32 नवे रूग्ण सापडले आहेत. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला. काल दिवसभरात 18 रूग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 2 हजार 296 झाली आहे.

पेण तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 912 रूग्ण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत. तसेच एकुण 65 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 319 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पेण शहरात 105 पुरूष व 49 महिला आणि ग्रामीण भागात 107 पुरूष आणि 58 महिला रूग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती पेण तहसिल कार्यालयाने दिली आहे.