पेण तालुक्यात कोरोना बाधीत 53 नवे रूग्ण, 9 बरे झाले

पेण : पेण तालुक्यात आज  कोरोना बाधीत 53 नवे रूग्ण सापडले आहेत. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 9 रूग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 2 हजार 349 झाली आहे.

पेण तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 921 रूग्ण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत. तसेच एकुण 66 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 362 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पेण शहरात 122 पुरूष व 60 महिला आणि ग्रामीण भागात 116 पुरूष आणि 64 महिला रूग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती पेण तहसिल कार्यालयाने दिली आहे.