पेण तालुक्यात रविवारी 37 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, तर रायगडात 350 नवे रूग्ण सापडले

पेण : जिल्ह्यात रविवारी ३५० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५०९ झाली आहे. त्यापैकी १२ हजार २५२ रुग्ण बरे झाले.

रविवारी दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत बाधितांपैकी १२ हजार २५२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर ४३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३,२५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी पेण तालुक्यात पेण ३७, अलिबाग २१, कर्जत २५, महाड ६, खालापूर २८, माणगाव ११, रोहा ११, श्रीवर्धन ६, म्हसळा ३ असे एकूण ३५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिवसभरात पनवेल मनपा ८९, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १३९, उरण १४, पनवेल ग्रामीण ६५, उरण ७, खालापूर ३८, कर्जत ९, पेण २४, अलिबाग १९, माणगाव १६, रोहा ६, श्रीवर्धन ३, महाड १८ आणि पोलादपूर १ असे एकूण २९५ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले.