पेण ( प्रतिनिधी ) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना पेण तालुका व शहराच्यावतीनेे विविध सामाजिक उपक्रमेे राबविण्यात आली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. भोंगा शाळा अंतोरे येथील आदिवासी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे चाईल्ड हेवन अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. बोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा म्हात्रे, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे यांच्या पुढाकाराने व जेएसडब्ल्यू सीएसआर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बोरी गावी आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, बालवाडीतील मुलांना पोषण आहार, लहान मुलाचे आरोग्य शिबीर, नूतन सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण, त्वचारोग तपासणी व औषधे उपचार त्याचप्रमाणे बोरी येथे ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले
या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या प्रमुख बाळू पाटील, पेण शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, विशाल दोशी, तुकाराम म्हात्रे, युवा सेनेचे चेतन मोकल, प्रसाद देशमुख, ग्राहक संरक्षणचे नंदूू मोकल, नरेश सोनवणे, विजय पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.