Konkan Railway : पेण नजीक रेल्वे रुळाला तडे, कोकण रेल्वे बाधित

railway-rool-break
पेण (राजेश प्रधान) : पेण नजीक रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अपघात टळला आहे. या मुळे 4 रेल्वे उशिराने धावल्याने कोकण रेल्वे बाधित झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण वरून पनवेल ला जाणाऱ्या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी 6 वाजुन 22 मिनिटांच्या दरम्यान आढळला. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यानी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तातडीने सुचित केले.
 रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातुन सुटणारी रोहा – दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानका नजीक थांबविले. यानंतर मडगाव – नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6:45 ला सुटणारी पेण – दिवा मेमु रेल्वे व मँगलोर- मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आले. सकाळी 7:30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.
nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *