पेण (राजेश प्रधान) : पेण शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वरच्या विभागाला बुधवारी रात्री अचानक आग लागल्याने सर्वत्र धुराचा लोट पसरल्याने परीसरात एकच खळबळ उडाली.
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्नाने 3 तासानंतर आग विझवण्यात यश आले.
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत रेकाॅड रुम, युपिएस रुम, चेक व लॉकर रुम, लोन विभागाचे आगीमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे समजून येत आहे.
यावेळी पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, नगरपालिका अधिकारी नरुटे,बँकेचे कर्मचारी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली.