पेण :’सावित्रीच्या लेकी आम्ही मागे आता रहाणार नाही’ असे जाहीरपणे म्हणत पेण मधिल आदिवासी महिला व युवतीनी आपल्या जनजाग्रृती अभियानास सुरूवात केली. अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधीमंच यांचे मार्फत दरवर्षीप्रमाणेच लिंगभेद समानता या विषयावर सार्वजनिक रित्या आपली भुमिका मांडण्या साठी अभियानस आजपासून सुरुवात करण्यात आली. या वेळेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डाॅ.वैशाली पाटील स्वतः उपस्थित होत्या.
अंकुर ट्रस्ट मार्फत घेण्या आलेल्या एक दिवसीय प्रशिक्षणात महिल व जंगल अधिकार, माझे आरोग्य माझे अधिकार या विषयावर अन्विता जाधव यांनी पी.पी.टी.दाखवुन मांडणी केली. तसेच तृप्ती धुरी व मिनल सांडे यानी विविध खेळ व जागृती गीते घेऊन सहभागी सावित्रीच्या सर्व लेकीना आनंद दिला.