पेण मधील सर्व पत्रकारांची अँटीजन टेस्ट होणार

पेण : रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते स्वर्गीय संतोषजी पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले, आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

मात्र, यापुढे कोरोनामुळे पेणमधील कोणत्याही पत्रकारावर संकट येऊ नये म्हणून, आज पेण प्रेस क्लब व पेण मधील पत्रकारांनी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेऊन घडलेल्या परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. यादरम्यान कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोग्य यंत्रणेला ताबडतोब दूरध्वनी वरून संपर्क साधून पुढील 2 दिवसाच्या आत पेण मधील सर्व पत्रकारांची अँटीजन टेस्ट करण्याचे आदेशच दिले. तसेच जे पत्रकार पॉझिटिव्ह येतील यांच्या परिवाराचीही अँटीजन टेस्ट करण्याचे आणि पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

या मागणीवेळी पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, राजेश प्रधान, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, सुनिल पाटील, स्वप्नील पाटील, नरेश पवार, संतोष पाटील, प्रशांत पोतदार, अनिस मणियार, अविनाश म्हात्रे आदी उपस्थित होते.