पेण (राजेश प्रधान) : पेण शहरातील एका खाजगी क्लासेसची विद्यार्थ्यांच्या सहलीची गाडी तीनशे फूट दरीत कोसळली दैव बलवत तर म्हणून जीवित हानी टळली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, पेण शहरातील येथील साठे क्लासेस मधील विद्यार्थी आणि शिक्षक असे एकुण 27 जण बसने लोहगड येथे सहलीसाठी गेले होते. मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड येथून पर्यटन करुन माघारी परत येताना बस क्रमांक MH 06 S9381 विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बस तब्बल तीनशे फुट खोल दरीत कोसळली.
या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बसचा अपघात झाल्याची बातमी समाज माध्यमातून पेण शहरात पसरताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.