माथेरान (मुकुंद रांजाणे) : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून मीरा फाउंडेशनच्या वतीने विधवा, अपंग तसेच निराधार लोकांना दरमहा एकहजार रुपयांचा दहावा मासिक हप्ता आज दि.१६ रोजी शिवसेना शाखेत देण्यात आला.
यावेळी शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, मीरा फाउंडेशनच्या संचालिका रेखा चौधरी,उप शहरप्रमुख प्रमोद नायक, माजी नगरसेवक संदिप शिंदे, प्रकाश सुतार, रवींद्र बिरामणे, जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे, युवा सेनेचे निखिल शिंदे, गौरंग वाघेला, अशोक वाघेला, अनिकेत जाधव, अकबर मुजावर, अनिस शेख,खालिद शेख, मयूर चौधरी यांसह महिला आघाडीच्या सदस्या, युवती सेनेच्या पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
माथेरान मधील काही कुटुंबातील सदस्यांना आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांची घरची परिस्थिती हलाखीची असून दिव्यांग, निराधार त्याचप्रमाणे विधवा महिलांना दर महिन्याला एकहजार रुपयांचा आधार देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. दर महिन्याला १४३ गरजवंतांना याचा लाभ होत आहे. देव देवळात नसून तो आम्ही माणसात पहात आहोत ही सदभावना ठेऊन काहीही अभिलाषा न बाळगता मदत करण्यासाठी निःपक्षपणे छोटासा प्रयत्न करत आहोत असे चंद्रकांत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
—————————— —
मागील वर्षी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा महेंद्र थोरवे साहेब यांच्या शुभ हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. 16 डिसेंबर 2021 ते आज 16 डिसेंम्बर 2022 पर्यंत या योजनेचे एकूण 13 हप्ते होतात. पतसंस्थेच्या आचारसंहितेचे 3 हप्ते सोडल्यास उर्वरीत 10 हप्ते 1,43,000/- प्रमाणे 14 लाख आपल्या मिळकतीतून गोरगरीब , गरजू, विधवा महिला, व जेष्ठ नागरिकांना पेन्शन स्वरूपात कोणताही खंड पडू न देता वाटप करणे हे चंद्रकांत चौधरी यांच्या हातून घडलेले अद्वितीय सत्कर्म आहे. यातून आपल्याला कोणताही राजकीय फायदा होईल याची त्यांनी कधीही तमा बाळगली नाही म्हणून आजच्या वर्षपूर्ती निमित्ताने चंद्रकांत चौधरी यांचं कौतुक करू तेवढ कमीच आहे. समाजसेवेचे हे व्रत जोपासण्यासाठी त्यांना त्यांच्या व्यवसायात, राजकिय क्षेत्रात उंच भरारी घेणेस बळ देवो हीच सदिच्छा.
—योगेश जाधव, अध्यक्ष वनव्यवस्थापन समिती माथेरान
—————————— —