पोलादपूर तालुका भाजपातर्फे घंटानाद, श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानाबाहेर केला सरकारचा निषेध

पोलादपूर (शैलेश पालकर) : राज्यातील आघाडीसरकारने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या अनेक प्रतिबंधात्मक उपाय व खबरदारीच्या योजनांना अनलॉक प्रक्रियेमध्ये पुर्ववत् सुरू करण्यात आल्यानंतरही अद्याप मंदिरांची टाळेबंदी हटविण्यात आली नसल्याने पोलादपूर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे शनिवार,दि.29 ऑगस्ट 2020 रोजी पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानाबाहेर घंटानाद करण्यात येऊन निषेध करण्यात आला.

लॉकडाउनच्या काळात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते मात्र सध्या अनलॉक प्रक्रियेत हळूहळू सर्व सुरू करण्यात येत असल्याने महाराष्ट्रातील मंदिरेच बंद का ठेवण्यात आली, असा सवाल करत पोलादपूर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत पोलादपूर श्रीकाळभैरवनाथ मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. हा राज्यव्यापी आंदोलनातील सहभाग असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे यांनी यावेळी सांगितले.

पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, मनोज भागवत, शहराध्यक्ष घोसाळकर, हरिश्चंद्र जाधव, गणेश गोळे, समीर सुतार, समाधान शेठ, तुकाराम केसरकर, शशांक घाडगे, राजा दीक्षित, अमोल भागवत, महेश निकम, राकेश सकपाळ, योगेश भोसले, सोपान शिंदे, महिला आघाडीच्या माई शेठ, रश्मी दीक्षित आदी उपस्थित होते.