पोलादपूर तालुक्यातील 16 उपसरपंच निवडीने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पुर्णत्वास

poladpur-gram1
पोलादपूर(शैलेश पालकर) : तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी झाल्यानंतर 2 जानेवारी 2023 रोजी या सर्व 16 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवडणूक होऊन तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवेळी उमरठ ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले तर बोरघर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी बंडू विठू पारधी, लोहारे सरपंचपदी दीपक पवार, धामणदिवी येथे सरपंचपदी क्षमता बांद्रे, चांभारगणी बुद्रुकमध्ये सरपंचपदी तानाजी पवार, कालवली ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी किरण पवार, दिविल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर देवे, भोगाव खुर्द मध्ये सरपंचपदी प्रियंका कदम, गोळेगणी सरपंचपदी प्रकाश दळवी, कोतवाल बुद्रुकमध्ये सरपंचपदी रेखा दळवी, कोतवाल खुर्द सरपंचपदी अविनाश शिंदे, कापडे खुर्द सरपंचपदी संदीप काळे, ओंबळी ग्रा.पं.सरपंचपदी रूपाली चिकणे, परसुले सरपंचपदी रमेश शिंदे, पैठणमध्ये सरपंचपदी शीतल येरूणकर सरपंच आणि पार्ले येथे सरपंचपदी आशा पवार यांची निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवार, दि. 2 जानेवारी 2023 रोजी उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडप्रक्रियेमध्ये सर्व 16 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध उपसरपंच निवडण्यात आले. यामध्ये उमरठचे सरपंचपद रिक्त असताना इंद्रजित कळंबे यांची उपसरपंचपदी निवड झाली तर धामणदिवी येथे नथुराम जाधव, ओंबळी येथे सखाराम चिकणे, पैठण येथे अरूण दरेकर, बोरघरमध्ये नारायण उतेकर, गोळेगणी येथे ज्ञानेश्वर मोरे, कोतवाल खुर्द बबन शिंदे, दिविलमध्ये प्रमोद मोरे, पार्लेमध्ये भिमराज शिंदे, चांभारगणी बुद्रुकमध्ये गणेश तळेकर, परसुलेमध्ये विलास जाधव, लोहारे येथे संदेश नरे, कोतवाल बुद्रुकमध्ये राजेश कदम, कालवलीमध्ये सविता भोसले, भोगाव खुर्दमध्ये कुंदा चिकणे तर कापडे खुर्दमध्ये सोपान निकम आदींची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती पोलादपूर पंचायत समितीचे विस्तारअधिकारी हंबीर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *