पोलादपूर शहरातील तरूणांसाठी क्रीडा संकुलाची गरज : शैलेश पालकर

 

palkar117पोलादपूर  : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली असून नजिकच्या काळात पोलादपूर शहरातील तरूणांसाठी क्रीडा संकूलाची असलेली गरज पूर्ण करण्यासाठी विनंती करणे क्रमप्राप्त आहे. तरूणांना फारकाळ गल्ली क्रिकेटमध्ये अडकवून ठेवता येणार नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी कविंद्र परमानंद मठ परिसरात आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी रात्रभर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत आनंदनगर अ संघाने विजेतेपद पटकाविले.

यावेळी उदघाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद इंगवले, रफीक धामणकर, बशीर धामणकर, जलील धामणकर, अकबर माटवणकर, अजीज धामणकर, भाई भाई क्रिकेट क्लबचे संस्थापक दिलावर धामणकर, अध्यक्ष नइम धामणकर, संतोष पांढरकामे, मुन्ना मुजावर आणि मुश्ताक मुजावर आदी उपस्थित होते. यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिलीप भागवत, दर्पण दरेकर, डॉ.राजेश सलागरे, डॉ.संजय शेठ, अभिजित मेहता यांनी स्पर्धेदरम्यान भेट दिली.

रात्रभर प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद आनंदनगर अ संघाने पटकाविले तर शिवाजीनगर संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेचे आयोजक भाई भाई क्रिकेट क्लब अ आणि ब संघ या स्पर्धेतील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला.