पोलादपूर (शैलेश पालकर) : गणेशोत्सव काळात मंदावलेल्या कोरोना रूग्ण वाढीने आता जोरदार मुसंडी मारली असून चार दिवसांमध्ये पोलादपूर शहरामध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची वाढ चिंताजनक दिसून आली आहे.
पोलादपूर तालुक्यात 30 ऑगस्टला उमरठ 1, चोळई 1 आणि पोलादपूर प्रभातनगर 2 असे 4 रूग्ण, 31 ऑगस्टला कापडे 1 आणि कापडे दिसेधोंड येथे 1 असे 2 रूग्ण, 1 सप्टेंबरला करंजे 1 आणि किनेश्वरवाडी 1 असे 2 रूग्ण व एका रूग्णाचा मृत्यू, 2 सप्टेंबरला वाकण 1 आणि बोरावळे 2 असे 3 रूग्ण, 3 सप्टेंबरला खांबेश्वरवाडी 1, वझरवाडी 1, बोरावळे 1, लोहारे 1, कापडे 1, पोलादपूर सैनिकनगर 1 असे 7 जण नोंदण्यात आले. आज 4 सप्टेंबरला पोलादपूर 9, कापडे 2, चरई1 आणि लोहारे 1 असे 13 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नोंदविण्यात आले, असून 199 रूग्ण संख्या झालीआहे. त्यापैकी 154 रूग्णांना घरी पाठविण्यात आले, असून 32 रूग्ण उपचार घेत आहेत, आणि 13 रूग्ण कोरोना मृत्यू झाले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे यांनी दिली.