पनवेल (संजय कदम) : नवी मुंबई परिमंडळ क्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश जाहीर झाले आहे. यासंदर्भात अतितातडीने ९ पोलीस निरीक्षकांच्या आणि २१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहतूक शाखेत बदलीचे आदेश जाहीर झाले.
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये
महेश पाटील यांची तळोजा वाहतूक शाखेतून नेरुळ पोलीस ठाण्यात,
सुनील कदम यांची तुर्भे पो. स्थानकातून तळोजा वाहतूक शाखेत,
सतीश जाधव यांची विशेष शाखेतून गुन्हे शाखेत,
विमल विडये यांची खारघर पोलीस ठाण्यातून एपीएमसी वाहतूक शाखेत,
संजय जोशी यांची पनवेल शहर पोलीस ठाण्यातून तुर्भे पोलीस ठाण्यात,
पृथ्वीराज घोरपडे यांची एनआरआय पोलीस ठाण्यातून सीबीडी वाहतूक शाखेत,
जगदीश शेरकर यांची सीबीडी वाहतूक शाखेतून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बदलीचे आदेश जाहीर झाले आहेत. त्यानुसार काहींनी पदभार सुद्धा स्वीकारले आहेत.