पोलीस मित्र संघटनेचे शेकडो समर्थक भाजपमध्ये दाखल

prashant-thakur1
कर्जत (गणेश पवार) : पोलीस मित्र संघटना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर शितोळे व महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष रमेश कदम यांच्यासह पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, कर्जतमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार असून कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घ्यावी, असे आवाहन केले. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यलयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, बीड जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष नवीन देशमुख, पंचायत समिती विभाग अध्यक्ष योगेश घारे, वेणगाव पंचायत समिती अध्यक्ष किरण घाग, किसान मोर्चा कार्यकारिणी सदस्य वसंतराव महाडिक, ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव मोरे उपस्थित होते. पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व शिवशाही माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर शितोळे, कोकण प्रदेश अध्यक्ष व समधर्म समभाव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम, रायगड उपाध्यक्ष राकेश पवार, कर्जत युवाध्यक्ष हेमंत कदम, सदाशिव कदम, गणेश कदम, यश करम, सतिष देशमु, समिर शितोळे, धंनजय शितोळे, नंदकुमार शिंदे, संदेश शिंदे, नितीन देशमुख, राकेश पवार, पींटया डाबीया, संदिप जाधव, सागर धनवटे, मंगेश चव्हाण, महेश फाले, महेंद्र धनवटे, प्रविण गवळी, महेश आगीवले, नामदेव आगीवले, मनोज हीलम, प्रविन पोट, रोशन आगीवले, विश्वास दर्डा, प्रकाश कामठी, कृष्णा निरगुडा, राजू पारधी, यशवंत मेहतकर, अनिल जोशी, हनुमंत जोशी, भास्कर रामा शेंडे, पाडुरंग देऊ निरगुडा, गणपत आंबो हिंदोला, मोतीराम चोरघे, गजानन धुले, छगन पाटील, काशिनाथ निरगुडा, काशिनाथ रसाल, गणपत हिंमाली, सुरेश ताली, तुकाराम बांगार, बाबू आगिवले, प्रीतम ठाकरे, प्रभाकर गवळी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करीत आहेत. तळागाळातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहचविण्याचे काम सतत होत आहे. जनआरोग्य, उज्ज्वला, अन्नसुरक्षा-रेशन, विमा, किसान सन्मान, घरकुल, असे अनेक लोकहिताचे निर्णय आणि योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करीत सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्याचे काम झाले आहे. जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वसामान्य माणसाचा विचार करणार्‍या पक्षात तुम्ही सहभागी झाले आहात. तुमच्या प्रवेशामुळे कर्जत तालुक्यामध्ये भाजपला ताकद मिळाली आहे, त्या अनुषंगाने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून पक्षाचा जास्तीत जास्त प्रचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *