माणगांव (रविंद्र कुवेसकर ) : पॉस्को महाराष्ट्र स्टील मल्टीनॅशनल कंपनीने आपल्या सी. एस. आर. उपक्रमांतर्गत वनवासी कल्याण आश्रम शाळा माणगांवच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी १२० बंक बेड (खाटा) आणि २४० गाद्यांची भेट स्वरूपात दिले. सदर बंक बेड हे उच्च प्रतीचे व त्यांस प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे वैयक्तिक साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र असे ड्रॉवर ची सुविधा असलेले तसेच स्लीपवेल कंपनीच्या गाद्या आहेत.
वनवासी कल्याण आश्रम शाळा हि एक सेवाभावी संस्था आहे, वनवासींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतीक विकासासाठी समाजाच्या दानशूर दात्यांच्या माध्यमातून संस्था अविरत सेवा करत आहे. या आश्रम शाळेतील विद्यार्थी सध्या खाली लाद्यांवरती झोपत होते. येथे बेड ची कोणतीही सुविधा नव्हती, ही विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन पोस्को कंपनीने बंक बेड देण्याचे ठरवले.
कंपनीने केलेल्या मदतीबद्दल शाळेचे व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. काही दिवसापूर्वीच पोस्को कंपनीने या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाशिंग मशीन आणि ड्रायर भेट दिले होते.
या प्रसंगी पोस्को मॅनेजमेंट टीम म्हणाली, “आम्हाला आनंद आहे की या उपक्रमांमुळे आम्ही या निवासी शाळेत राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकलो. एक कंपनी म्हणून आम्ही अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे समाजाच्या सामाजिक विकासासाठी योगदान देण्यावर नेहमीच लक्ष केंद्रित करू.”